शिवसेनेतील चार आमदार माझ्या संपर्कात नारायण राणे यांचा दावा
पुणे : एकनाथ शिंदे यांनी शिंदे गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेतील बऱ्याच आमदारांनी शिंदे गटात व भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये सहा, सात फक्त आमदार राहिले आहेत.त्यावरठाकरे गट कुठे राहिला .राहिलेले सहा सात ते ही वाटेवर आहेत.आज नाही सांगत परत सांगेल,माझ्या संपर्कात ४ जण आहेत. असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेतील बरेच आमदार शिंदे गटात दाखल झाले.सोडून महाराष्ट्र आणि देश आहे. उद्धव ठाकरे यांचं राजकारण फक्त आणि फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांचा गट संपला आहे. शिवसेना कुठे राहिली आहे? राज्यातील जनतेला दिवाळीचं रेशन मिळालं नाही.असे विरोधक आरोप करत आहेत . वाईट वाटत असेल तर विरोधकांनी शिधा द्यावा. विरोधकांना घर बसल्या काही काम उरलं नाही. ते फक्त टीका करत आहेत. अशी टीका राणे यांनी केली.
काही लोक टिंगल टवाळी करत आहेत. मिमिक्री करत आहेत. यांचा कसला बालेकिल्ला? जे बोलत आहेत. त्यांचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राचा राजकीय स्तर घसरलेला नाही. ज्या पक्षातील हे लोक आहेत. त्या पक्षाच्या लोकांनी तपासलं पाहिजे. तुम्हाला भास्करची भाषा आवडते का? माझीच मुलं कशी दिसतात? असा सवालही नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे म्हणाले,नरेंद्र मोदी यांनी तरुण तरुणी यांना नोकरी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील १० लाख नोकऱ्या पहिला टप्पा केला शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत.पंतप्रधान चांगले काम केले आहे.७५ हजार नोकऱ्या दिल्या ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे.कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निम्मित काही बोलणार नाही. असे नारायण राणे म्हणाले.
आपण सगळ्यांनी मोदींचं भाषण ऐकलं आहे. मागील आठ वर्षात पंतप्रधान मोदी आपल्या देशाला कसं आर्थिक सबलीकरणाकडे घेऊन जात आहेत ते त्यांनी सांगितलं आहे. भारत सुरक्षित आहे. काळजी करण्याची गरज नाही. कारण पंतप्रधानपदी मोदी आहेत, असंही ते म्हणाले. सामना या वृत्तपत्रांमधून दररोज भाजप आणि शिंदे गटावर टीका होत आहे. त्यावर,नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, मी सामना वाचत नाही. पाहत नाही .अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
