fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शंभर रूपयांत नाही मिळत किट हिच भाजपची फसवणुकीची रित- राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे:महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या “शंभर रुपयात किराणा किट” या फसव्या योजनेच्या निषेधार्थ व अन्नधान्य वितरण व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दांडेकर पुल येथे आंदोलन करण्यात आले.

मोठमोठी आश्वासन् देवून ती पूर्ण न करणाऱ्या या भाजपवाल्यांनी नेहमीप्रमानेच यावेळीही राज्यातील जनतेला फसविलेच आहे.दिवाळी सुरू होवून सुध्दा अजूनही कार्डधारकांना धान्य मिळालेले नाही. शंभर रुपयात किराणा किट ची घोषणा केली, पुरवठादाराने किराणा किट उपलब्ध देखील करून दिल्या परंतु या किटवर फसवणुकीचे बोधचिन्ह असणाऱ्या शिंदे -फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे या किट वितरित करण्यात आल्या नाही. अखेर गरिबांना दिवाळीच्या एक दिवस अगोदर देखील संबंधित किट मिळालेल्या नाहीत. प्रगत व विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, गेल्या दोन वर्षात कोविडमुळे दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी करता आली नव्हती यावर्षी ती आनंदात साजरी करता येणार अशी खोटी आश्वासने देत शिंदे- फडणवीस सरकारने ही लोकप्रिय घोषणा केली. परंतु आजही गरिबांना संबंधित किट मिळू शकलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गोष्टीचा निषेध करते महाविकास आघाडी सरकारच्या काळात कडक लॉकडाऊन असताना देखील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अत्यंत सुनियोजितपणे सुरू होती. या सरकारने लोकप्रिय घोषणांच्यापायी संबंधित व्यवस्था बिघडवली असून जी काही आश्वासने दिली होती ती देखील यांना पूर्ण करता आली नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदर बाबीचा निषेध व्यक्त केला येत्या दोन दिवसात सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली पुन्हा पूर्ववत सुरू न झाल्यास पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील. 
याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ,संतष नांगरे, मृणालिनी वाणी, प्रिया गदादे, विपुल मैसुरकर, बाळासाहेब अटल, विजय बागडे, समीर पवार, शशिकला कुंभार, अमोल ननावरे, मोनहाज शेख, संजय दामोदरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, शिवम ईभाड, संकेत शिंदे,व इतर प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading