Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 10-12 आमदार शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात -उदय सामंत

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, बारा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यांची उदय सामंत संवाद साधला त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.

उदय सामंत म्हणाले,युवासेना पदाधिकारी आज नियुक्त करण्यात आले .बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत .शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले आहेत. मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो. मी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो,. शिवसेनेतील आमदार व कार्यकर्ते हे सारखे शिंदे गटातील आमदारांना 50 खोके म्हणून डिवचत आहेत.दिवाच्ण्याचा पेक्षा विकास काय करणार हीच priority आहे.महाराष्ट्राचा विकास कसा करणार हे जनतेला सांगितलं तर महत्त्वाचे आहे . अशी टीका सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

दोन महिन्यापूर्वी कात्रज मध्ये आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली. सभे नंतर उद्या सामंत यांच्या गाडीवर काय शिवसैनिकांनी हल्ला केला.जर हल्ला झाला तर तो चौकशी व्हायला पाहिजे.असे हल्ला मी पण अनुभवला आहे. मी सेने मध्ये काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून केले आहे . असे सामंत म्हणाले.
राष्ट्र्वादीबाबत पुन्हा एक धक्कादायक बातमीसमोर आली आहे. मध्यंतरी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीविरोधात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली होती. यामध्ये 5 जणांना अटक केली असून आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.दाऊद हा देशाचा दुश्मन आहे . असे उदय सामंत म्हणाले.

सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्यातील शिंदे, फडणवीस सरकारने शंभर रुपयांमध्ये दीपावली आनंद शिधा (किट) देण्याची घोषणा केली खरी. परंतु अद्यापही या किटचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आलेला नाही. किट वर असलेले स्टिकर हे शासनाचा एक प्रोटोकॉल आहे .इतक्या वर्षात अशी योजना कोणी ही आणली नव्हती .सरकार ची किट देण्याची दानत आहे ते का पोहचले नाहीत याची तपासणी करणार. थोडे फार मागे पुढे झाले असेल पण हे दिले जाईल. असे सामंत म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading