fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही -उदय सामंत

पुणे : शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे आता कळलं आहे. मी लवकरच कात्रजला मेळावा घेणार आहे, कोणीतरी माझ्यावर हल्ला केला म्हणून कात्रजला मेळावा घेणार नाही. 100 दिवसात केलेलं काम मी या मेळाव्यात मांडणार. बाळासाहेबांची शिवसेना पुण्यात वाढवल्याशिवाय राहणार नाही.उद्योग मंत्री उदय सामंत पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच दसरा मेळाव्याचा उल्लेख करत आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती, पण आपण मार्केटिंगला कमी पडलो असं त्यांनी सांगितलं.
या मेळाव्याला किरण साळी, शहर प्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले व विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुणांना उद्योगासाठी 10 लाखाचं कर्ज लवकर उपलब्ध करून देणार. पुण्यामध्ये आपल्याला 1,500 उद्योजक निर्माण करायचे आहेत, हे युवा सैनिकांना आता टार्गेट आहे. काही लोक आधी सांगायचे की आम्ही वडापाव खाऊन काम केलं. पण तेव्हा शाखाप्रमुख वडापाव खायचा आणि वरचे लोक बिर्याणी खायचे. आता बिर्याणी वरच्या लोकांनी खाल्ली तर खालचा शाखाप्रमुख देखील बिर्याणीच खाणार. भविष्यत शिंदे साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून द्यायचं आहे. असे उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत म्हणाले,अनेकांनी दसऱ्याच्या दिवशी स्टँडअप कॉमेडी केली, नकला केल्या. आपल्या दसऱ्या मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होती, पण आपण मार्केटिंगला कमी पडलो. त्यांनी आपल्याला एक शिवी घातली की आपण त्यांना एक विकासकाम दाखवायचं. बाळासाहेबांसोबत काम करू शकलो नाही पण शिंदे साहेबांकडे पाहून बाळासाहेबांचा भास होतो. अडीच वर्षात जे काम झालं नाही ते काल 3 तासांत उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन केलं. मुंबई महापालिकेत आम्ही दाखवून देऊ की कोण पळपुटे आहेत. रमेश लटके जर आज जिवंत असते तर त्यांनी देखील शिंदेंना पाठिंबा दिला असता. असे उदय सामंत म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading