Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं वाटोळं केल – अजित पवार 

पुणे : पुणे शहरात काल रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजला. सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे महापालिका प्रशासनावर नागरिक व विविध पक्षातील नेते आरोप करत आहेत. पाऊस ओसरल्यानंतर आता पुणे महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार कालच्या पावसानंतर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर चांगलेच बरसले आहेत.

अजित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहीत भाजपवर टीका केली आहे. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणाले आहे.

अजित पवार म्हणाले, तूर्तास पुण्यातील जनतेला आवश्यक ती सर्व मदत करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करतंच आहोत. जनतेनं देखील आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन करतो. सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती पाऊलं उचलून स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असून त्याचा आढावा आम्ही घेत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading