आणखी दोन दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : पुण्यात काल रात्री नऊ वाजल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने एकच हाहाकार माजला. मुसळधार पावसाने पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवला. २०२० या वर्षाननंतर २४ तास एवढ्या कालावधीत १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ होती. तरी आणखी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. अनुपम कश्यापी म्हणाले, “माझ्या माहिती नुसार एवढ्या कमी कालावधीतला काल रात्री झालेला पाऊस सर्वाधिक आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ अशी स्थिती आणि दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणखी दोन दिवस अशी स्थिती कायम राहणार आहे. यामुळे पुढील दोन दिवस कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनीसतर्क राहावे. रेनकोट – छत्री सोबत बाळगावी, पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या दिनक्रमाचे नियोजन करावे, असेअनुपम कश्यापी म्हणाले.
शहराचा पावसाचा इतिहास पाहता, दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये ऑक्टोबरमध्ये १४४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरच्या चार वर्षांमध्ये म्हणजे २०१६पर्यंत एकदाही ऑक्टोबर महिन्यात शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाही. पण यामध्ये २०१८ चा अपवाद वगळता दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हवामान खात्यात नोंदवला गेला. दरम्यान, दिवाळीपर्यंत हा पाऊस कमी होईल असा अंदाज अनुपम कश्यापी यांनी वर्तविला आहे.
