Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुढील सरकार पण भाजप- शिंदे यांचेच असणार रावसाहेब दानवे यांचा विश्वास

पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार व जयंत पाटील आणि नाना पाटील यांनी शिंदे व फडणवीस सरकार पाच वर्षे टिकणार नाही. असे म्हटले आहे. त्यावर शिंदे फडवणीस सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढील सरकार पण भाजप- शिवसेना शिंदे यांचेच असणार.असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात व्यक्त पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

रावसाहेब दानवे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात आक्षेप घेतलेला आहे. त्यावर बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आक्षेप घेणे हे त्यांचे काम आहे आणि विरोधी पक्ष म्हणून ते घेतच राहणार. पण आम्ही आमचे काम करत राहू. त्यांनी आक्षेप घेत राहावेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
ठाकरे गटातील पदाधिकारी तथा मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. पटेल यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आरोप नाईक यांनी केला आहे. तसेच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा. अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे. या मागणीला घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत.असा अशी माहितीही रावसाहेब दानवे यांनी दिली.
अंधेरी पोट निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होईल. असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading