डॉ. तानाजी सावंत यांच्या महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेचा सीआयडी तपास करा – डॉ. नीलम गोर्हे
पुणे : हडपसर भागातील असलेल्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रसंग घडला आहे. सदर ठिकाणी या तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रसंग घडला आहे. याबाबत तिने हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक १२ ऑक्टोबर, रोजी तक्रारही दाखल केली आहे. मात्र आज या पोलीस स्टेशनमध्ये या तरुणीने आपली तक्रार मागे घेतल्याचे पत्रकारांकडून समजले आहे.
महिला अत्याचार या संदर्भात नॉन कंपाउंड गुन्हा असताना महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो मागे घेता येत नाही या पार्श्वभूमीवर या प्रकरणांमध्ये सदर तरुणीवर कोणी राजकीय किंवा आर्थिक दृष्ट्या दबाव आणत आहे किंवा काय याबाबत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशन पातळीवर होण्यामध्ये काही समस्या येत असतील तर हा तपास सीआयडी कडे देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे विधान परिषदेच्या उप सभापति ना. डॉ. नीलम गोर्हे यांनी केली आहे. आज याबाबत त्यांनी पोलिस आयुक्त आणि उपायुक्त झोन ५ यांना याबाबत निवेदन दिले आहे. पुणे शहर शिवसेनेच्या उप शहर संघटिका प्रा. विद्या होडे यांनी याबाबत माहिती घेतली आहे.
