Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या कारला अपघात

अंबाजोगाई : भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी  यांच्या कारला समोरून येणा-या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास मस्साजोग (ता. केज) जवळ झाला.

माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड येथील कार्यक्रम आटोपून माधव भंडारी आणि राम कुलकर्णी अंबाजोगाईकडे निघाले होते. मस्साजोगजवळ त्यांच्या समोरून येणारा अ‍ॅपे रिक्षा मातीच्या ढिगा-यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या कारला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही तर रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading