Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी उत्साहाच्या भरात घेतला अजित पवार यांचा एकनाथ शिंदे यांना टोला

पुणे : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल.तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल. असे मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.दहीहंडी ला खेळाचा दर्जा देऊन गोविंदाना 5 टक्के क्रीडा आरक्षण देण्याची घोषणा सीएमनी केली असली तरी ही घोषणा प्रत्यक्षात उतरणं काहिसं अशक्य वाटतं. असं राज्याचे विरोधी पक्ष नेतेअजित पवार हे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले. अजित पवार म्हणाले,कारण त्याचे निकष नेमके ठरवणार तरी कसे? हाच खरा प्रश्न आहे. तरीही या सरकारनं ठरवलंच असेल तर बघुया ते कसं करतात. 

गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले असून आपल्या राज्य संघाने सर्वाधिक १४० पदके जिंकली आहेत. त्यांचा सत्कार आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र ऑलांपिक असोसिएशन मार्फत सरकार कडे पदक विजेता संघाला व खेळाडूं ला रक्कम वाढून मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करणार आहे. 

अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना खेळाडूंच्या विषयाला पाहिलं प्राधान्य दिलं.विभाग,जिल्हा, आणि तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी दिला. असे अजित पवार म्हणाले.
ऑलम्पिक पदक विजेता संघाला व खेळाडूं ला रक्कम वाढून मिळावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांची मंगळवारी रोजी भेट घेणार आहे.  खेळात महिलांची संख्या ही कमी दिसत आहे. त्यावर खेळात महिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन खेळाडूंना अजित पवार यांनी दिले.
ऑलिंपिक भवन महाराष्ट्रात व्हावे ही खेळाडूंची इच्छा आहे. लवकरच महाराष्ट्र ऑलिंपिक भवन बांधणार आहे.
यावं मागच्या आमच्या सरकारने सर्व खेळाडूंना आर्थिक मदत केली आहे.खेळाडूंच्या कामगिरीची नोंद करण्यासाठी कामगिरी आढावा समिती स्थापन करणार. अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading