Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अन्यथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही – संभाजी ब्रिगेड

पुणे : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात आली. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा,अन्यथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पुणे जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.

० ते २०विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातील शाळांबाबत माहिती जमा करण्यात येत आहे व त्यांचे समायोजन म्हणजेच त्या शाळा बंद करण्याचं धोरण राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याची सुतोवाच स्वतः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. याचा सर्वात मोठा व दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल व आदिवासी घटकांना आणि मुख्यत्वे मुलींना बसेल अशी स्थिती आहे. या सामाजिक संस्था आक्रमक झाले आहेत. या सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड ने पण विरोध केला आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading