fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

“तुम करे तो रासलीला… हम करे तो कॅरेक्टर ढिला…’ ऐसा कैसे चलेगा दादा सुषमा अंधारे यांचा भाजपला टोला

पुणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलत असताना शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली असल्याचं समजतंय. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे म्हणाल्या, “तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला..” ऐसा कैसे चलेगा दादा? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी भाजपला टोला लगावला आहे. सुषमा अंधारे आज पुणे विद्यापीठ येथील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गट सर्वांनाच त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या प्रवेशाआधी त्यांचे काही लोक मलाही संपर्क करत होते.त्यांनी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे. साम दाम दंड भेद अशी सर्व नीती शिंदे आणि त्यांचे सहकारी वापरत असल्याचं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.

अंधारे म्हणाल्या, सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्हाला मान्य आहे, आणि तो आम्ही करणारच सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी आली त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार, देखील त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, जे पुणे विद्यापीठात विद्यार्थी शिकत असतात. त्यांना भरपूर दिवसापासून वसतिगृह उपलब्ध नाही. म्हणून आज विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झाले. विद्यार्थ्यांना वसतिगृह भेटले पाहिजे. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading