Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील फ्लेक्स अज्ञातांनी फाडला; गुन्हा दाखल

पुणे:पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाबाहेरील फ्लेक्स अज्ञाताकडून फाडण्यात आला असून, सदर प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून थंडीच्या पार्श्वभूमीवर घरेलू काम करणाऱ्या महिला आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत स्वेटर वाटप करण्यात येणार आहे. यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड मधील जनसंपर्क कार्यालयात शनिवार पासून नाव नोंदणी करण्यात येत असून, त्यासंबंधी माहितीसाठी फ्लेक्स लावण्यात आला आहे. सदर फ्लेक्स अज्ञातांकडून फाडण्यात आला असून, त्यासंदर्भात कोथरूड मधील अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading