Friday, June 19, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली :  समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचं दीर्घ आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यादव यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना गुरुग्रामच्या मेदांचा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. २ ऑक्टोबरपासून ते व्हेटिंलेटरवर होते. आज सकाळी ८.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलायमसिंह यादव यांना श्वास घेण्यास अडचण होत अस्याने त्यांना २२ ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढ-उतार पाहायला मिळत होते. १ ऑक्टोबर रोजी त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी मेदांता हॉस्पिटलच्या पीआरओने सांगितले होते की, युरिन इन्फेक्शनबरोबरच मुलायमसिंह यादव यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती ढासाळली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसंच, त्यांची किडनीही व्यवस्थित काम करत नव्हती. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलायमसिंह यादव यांचा जीवनप्रवास

मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला. पाच भावंडांमध्ये मुलायमसिंह यादव तीन क्रमाकांचे भाऊ होते. करिअरच्या सुरुवातीला ते पैलवान होते. तर, पेशाने ते प्राध्यापक होते. काही वर्षे त्यांनी इंटर कॉलेजमध्ये शिकवण्याचं काम केलं. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवण्याचं होतं. मात्र, गुरू नत्थू सिंह यांच्या प्रभावाने मुलायमसिंह यादव राजकारणात आले. जसवंतनगर विधानसभेच्या जागेवरून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. १९८२-१९८५ पर्यंत ते विधानपरिषदेचे सदस्य राहिले.

लोहिया आंदोलनात मुलायमसिंह यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याच काळात त्यांनी ४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. राजकीय आखाड्यातील पैलवान म्हणून मुलायमसिंह यादव यांची ओळख होती. त्यांनी तीन वेळा राज्याची कमान सांभाळली. ते देशाचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. उत्तर प्रदेश विधानसभेचे ते आठवेळा सदस्य राहिले.

१९६७ साली मुलायमसिंह यादव पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर, ५ डिसेंबर १९८९ साली पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे ते मुख्यमंत्री बनले. सोशलिस्ट पार्टी, प्रजा सोशलिस्ट पार्टी असा प्रवास करत समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली. १९६७, १९७४, १९७७, १९८५,१९८९ मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. तर, १९८९, १९९३ आणि २००३ मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

१९९६ मध्ये निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. २००४ रोजी ते मनपुरीतून लोकसभा निवडणूक लढले. २०१४ मध्ये त्यांनी आजमगढ आणि मैनपुरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही मतदारसंघातून ते जिंकून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी यश संपादन केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading