Friday, June 19, 2026
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi S4 – Day 7 ! घरामध्ये येणार सुपरहिरो ! कोण असेल हा सुपरहिरो ?

बिग बॉस मराठी सिझन चौथा सुरु झाल्यापासून एका गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते, आणि ज्याबद्दल बऱ्याच चर्च रंगल्या ती म्हणजे, बिग बॉस चावडी यावर्षी होणार ? महेश मांजरेकर सदस्यांची शाळा घेणार कि नाही ?. यावर्षी चावडी चांगलीच रंगली. महेश सरांनी सदस्यांची शाळा घेतली, सदस्यांची कानउघाडणी केली तर सदस्यांना कुठे ते चुकतं आहे सांगितले, काहींचे कौतुक केले. काल सदस्यांना सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही… आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईझ ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो… कोण असेल हा सुपरहिरो ? आज कळेलच.

बिग बॉसनी जाहीर केले कि, “घरात भेटीला येणार आहे एक सुपरहिरो. सुपरहिरोच्या स्वागतासाठी आपणा सर्वांकडे तयार होण्यासाठी वेळ आहे ४५ मिनिटं” या घोषणेनंतर घरातील सदस्यांची तारांबळ उडाली. सदस्यांची सुरु झाली धावपळ… बघूया कोण आहे हा सुपरहिरो ? आणि यांच्या येण्याने घरामध्ये काय घडेल? बघूया आजच्या भागात.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading