fbpx

उद्धव ठाकरे यांच्या नातूला जर अस काही वक्तव्य केलेलं त्यांना आवडेल का ?-शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

पुणे:आदित्य ठाकरे यांनी लवकर लग्न केले पाहिजे असे शिंदे गटातील काही आमदार म्हणत होते. पण उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे नातू व मुलावर पण टीका केली. त्यावरआदित्यच लग्न लवकर झालं पाहिजे.त्यांना पण नातू होईल. त्याचे लाडू खायला आवडेल पण उद्धव ठाकरे यांच्या नातूला जर अस काही वक्तव्य केलेलं त्यांना आवडेल का ? असा सवाल उत्पादन शुल्क मंत्रीशंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या नातवावरही टीका केली. त्यावर उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यात आमच्यावर केलेली टीका समजू शकतो.पण मुख्यमंत्री आणि त्याच्या नातवा वरची टीका खालच्या दर्जाची.पण आजपर्यंत अनेक टीका पाहिल्या पण अशा टीका कुठे ऐकल्या नव्हत्या.उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.त्यामुळं आम्ही दुखावलो गेलो आहे.असे अनेकजण दुखावले आहेत.अनेकजण यात नाराज होऊन निषेध करत आहेत. असे शंभूराजे देसाई म्हणाले.
धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे गटाने आज कोर्टामध्ये दाखला दाखल केला आहे.कोर्टामध्ये काय दाखल केला मला माहिती नाही.मी या सर्व घडामोडीमध्ये शिंदे साहेबांसोबत आहे. 
एकनाथ शिंदे यांना शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री म्हणूनका निवडले.त्यावर सर्व पदाधिकारी यांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे याना नेते केले आहेत.शिवसेना सोडली नाही आम्ही नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना निवडले आहेत.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र काम करत आहेत त्या कामाचा भरपूर समाचार घेतला.100 दिवस झाले आमचे आणि उद्धव साहेब तुम्हीच ठरवा.मी उद्धव साहेब यांच्या मंत्रिमंडळ नामदारी होतो.आता चांगलं काम चाललं आहे.अनेक निर्णय केले आहेत.मुख्यमंत्री 18 तास काम करत आहेत,सगळे मंत्री झटून काम करत आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपची स्क्रिप्ट वाचली. असे शिवसेनेचे नेते आरोप करत आहेत.सामना म्हणजे महाराष्ट्र का ? सोशल मिडिया कोणाला तरी डॅमेज करण्यासाठी असतात.भाजपची स्क्रिप्ट नव्हती. कोणी काहीही बोलत.मुख्यमंत्री दसरा मेळावामध्ये त्याने वेगळे भाषण केले विकासाच बोलले. असे प्रत्युत्तर शिवसेनेला शंभूराजे देसाई यांनी दिले.
वेदांत प्रकल्प शिंदे व फडणवीस सरकार मुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला. असा आरोप विरोधक करत आहेत .त्यावर वेदांत एवढाच मोठा प्रकल्प दिला जाईल. अस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वसन दिल आहे. असे देसाई म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करु नये यासाठी एक बाबा सोडला नाही की, एक भाई सोडला नाही. मला जीवे मारण्यासाठी शकील-छोटा राजनला उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.नारायण राणे बोलत असतील तर त्या तथ्य असेल,त्यांनी सगळी माहिती गृहमंत्री यांच्याकडे द्यायला हवी.त्यावर त्यांनी चौकशी करण्यासाठी कागदपत्रे द्यावे,बाकी गृहखाते बघेल,मला अंडर वर्ल्ड काय असत माहिती नाही. असे शंभूराजे देसाई म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: