दोन दिवसात ठाकरे यांच्या सर्व प्रशांची उत्तरे देणार – शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या नातवावरही टीका केली. त्यावर उध्दव ठाकरे यांच्याबदद्ल आम्हाला आदर आहे. मात्र ते दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर जे काही बोलले त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो. अखेर माझे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीमध्ये गेल्यावर माझी अस्वस्थता कमी झाली. मात्र उध्दव ठाकरेंनी आमच्याबाबत जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे शिंदे गटाचा प्रवक्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या सर्व प्रशांची उत्तरे दिली जातील. अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
दीपक केसरकर म्हणाले, मी उद्धव ठाकरेंबाबत काहीही बोलणार नाही. त्यांनी आमच्या आमदारांबाबत आणि सरकारबाबात काहीही बोलले. तरी मी उत्तर देणार नाही.दसरा मेळाव्यात मी झोपलो तर विचार करत होतो. मी झोपलो असतो तर माझे हात कसे हलले असते.
उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे मी अस्वस्थ झालो. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे. असे केसरकर म्हणाले.
भाजप नेते राम कदम यांनी आदिपुरुष वर बंदी घालण्याची मागणी केली. यावर बंदी घालायची की नाही हे ठरवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. गृहमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील.असे दीपक केसरकर म्हणाले.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.शिदे गट पाठिंबा देणार का त्यावर केसरकर म्हणाले,* अंधेरी पोटनिवडणुकीत आमची भाजपसोबत युती आहे. त्यांनी जर आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं तर आम्ही एका आमदारकीसाठी आम्ही हट्ट करण्यात अर्थ नाही.
शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक अथॉरिटी आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. जो काही निर्णय निवडणूक आयोगाचा असेल त्याप्रमाणे पुढचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील. आमची बाजू सत्याची आहे.त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वासही दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.
दोन अडीच वर्ष मी सरकार येणार म्हणत होतो, मी काय वेडा नव्हतो असं बोलायला. आम्ही सर्व प्लॅनिंगमध्ये होतो. ४० जणांना बाहेर काढणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठीची यंत्रणा माझ्या मनात होत्या.असा दावा काल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला. या दाव्याला आज शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. हा आमचा उत्स्फुर्त उठाव होता. आमचा हा उठाव काही तत्वांसाठी होता. आमचं या संदर्भात अगोदर कोणतही प्लॅनिंग नव्हते, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
