fbpx

लोन ॲपद्वारे लुबाडणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे :नागरिकांना लोण ॲपद्वारे लुबाडणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर पहिल्यांदाच अशी मोक्का कारवाई करण्यात आल्याचा  दावा पोलिस आयुक्त आमिताभ गुप्ता यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे.

या टोळीत सहभागी असणारे हे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
सायबर गुन्हेगारांवर मोका”नुसार झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
या विषयी बोलताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, मुख्य आरोपी व टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड , प्रमोद जेम्स रणसिंग सॅम्युअल संपत कुमार , सय्यद अकिब पाशा मुबारक अफरोज बेग , मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम , अरुर मोहम्मद मनियत पिता मोहिदु अशी मोका नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत. 
टोळी प्रमुख धीरज पुणेकर याच्या नेतृत्वाखाली संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणूक केली. पुणेकर व त्याच्या टोळीतील इतर आठ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: