fbpx

आता पुन्हा तिसरी पासून परिक्षा सुरू केली जाणार – शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर

पुणे: राज्यात आठवी पर्यंत परिक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता पुन्हा तिसरी पासून परिक्षा सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे
दीपक केसरकर म्हणाले,याबाबत राज्यातील शिक्षण तज्ज्ञांची चर्चा सुरू असून त्यानंतरच अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासाही केसरकरांनी यावेळी केला.

दीपक केसरकर म्हणाले की, आठवी पर्यंत परिक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवी पर्यंत त्यांना अनुत्तिर्न करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. त्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता तीसरी पासून पुन्हा परिक्षा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे.तसेच परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल.
तसेच सर्वांना विश्‍वासात घेऊन शिक्षण विभागातील निर्णय घेण्यात येतील असे दीपक केसरकर म्हणाले. सध्या राज्यभरात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्या शिक्षकांचे समायोजन आधी केली जाईल त्यानंतरच शिक्षक भरती होऊ शकेल. या प्रकारामुळे अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळेल शिवाय त्यातून वाचलेल्या पैशातून मुलांना शिष्यवृत्ती वाढविता येईल. त्यामुळे केवळ शिक्षकांचा वेतन हाच प्रश्न महत्वाचा नाही तर इतर गोष्टीही महत्वाच्या आहेत .अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. त्यावेळी त्यांनी शिक्षक भरती लगेचच होणार नसल्याचे सुतोवाच केले.

दीपक केसरकर म्हणाले की, वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याआधी तेथील विद्यार्थी आणि अतिरिक्त शिक्षक यांची माहित घेतली जाईल त्यानंतरच तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांनी अमूक एका ठिकाणी शिक्षण घेतले तरच त्यांची गुणवत्ता वाढते असे नाही त्यामुळे त्यांच्या शाळा बंद झाल्या तरी आसपासच्या शाळेत त्यांचे समायोजन होईल, त्यांना शाळा लांब पडत असेल तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येईल.
कमी मुलांमध्ये शिकण्यापेक्षा मोठ्या गटात शिक्षण घेतले तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो. त्यांची नेतृत्वगुणाला ते पोषक आहे अशी माहितीही दीपक केसरकर यांनी दिली

Leave a Reply

%d bloggers like this: