fbpx

‘अथांग’ वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट…

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरीज ‘अथांग’. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलंय. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित ‘अथांग’मध्ये  संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांची फौज झळकणार आहे.

‘अथांग’ चा रंजक व उत्कंठावर्धक टीझर पाहून वेबसिरीज पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. वेबसिरीजचा टीझर पाहताना ‘अथांग’ वेब सिरीज हॉरर की थ्रिलर? असा प्रश्न पडतो. एका शापित कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक तरल प्रेमकथाही पाहायला मिळेल.

प्लॅनेट मराठी चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” आतापर्यंत प्लॅनेट मराठीनं अशा प्रकारच्या आशयाची निर्मिती केलेली नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि मागणीनुसार आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती करतो. ‘अथांग’ ही त्यापैकीच एक आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तेजस्विनी पंडित उत्तम अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण आहे. प्लॅनेट मराठीच्या गाजलेल्या ‘अनुराधा’ आणि ‘रानबाजार’ या वेबसीरीजमध्ये तिनं जबरदस्त परफॉर्मंस दिलाय. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक ताकदीची निर्मितीसुद्धा आहे. तिला आशयाची जाण असल्याने ही वेबसिरीज सर्वांचे लक्ष वेधून घेईल.” ‘अथांग’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: