fbpx

आधी उद्धव ठाकरे यांची सभा ऐकणार आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची- अजित पवार

पुणे:आज दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते कोणाचा मेळावा पाहणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर मी मेळावा पाहू शकत नाही.पुण्यात 2 वाजेपर्यंत कार्यक्रम आहेत.त्यानंतर 4 वाजता बारामती येथे कार्यक्रम आहेत.ते सर्व कार्यक्रम झाल्यानंतर,काटेवाडे येथे जाऊन आईचे दर्शन घेणार आहे. तसेच सात च्या पुढेच यांच्या सभा सुरू होतात.त्यामुळे सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची सभा ऐकणार आणि त्यानंतर एकनाथराव शिंदे यांची सभा ऐकणार आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अजित पवार पुण्यातील काही दुकानांचे उद्घाटनासाठी ते आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत होणार्‍या दोन्ही मेळाव्यास किती गाड्या जाणार,किती कोटी रुपये एसटीला भरले.अशी चर्चा सुरू आहे.शिंदे चा गट आणि शिवसेना मूळ पक्ष ते दोघ आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, वर्षानुवर्षे शिवतीर्थावरवरून दसरा सणांच्या निमित्ताने मेळाव्याच्या माध्यामातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे.ती परंपरा पुढे देखील चालत आली. पण आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपलाच मेळावा कसा भव्य दिव्य होईल. हा प्रयत्न कार्यकर्ते करताना दिसत आहे. असे अजित पवार म्हणाले.
शिंदे आणि ठाकरे यांनी जरूर आपली ताकद दाखवण्याचा, पक्ष वाढवण्याचा आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. पण लोकशाहीची परंपरा जपत कुणाही बद्दल वक्तव्य करू नये, महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लागणार नाही, कमीपण येणार नाही आणि दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.असा निर्वाणीचा सल्ला अजित पवारांनी शिंदे वठाकरे गटाला दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: