fbpx

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा     

मुंबई  : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेचा संदेश देत समाजात घडवलेले परिवर्तन अतुलनीय आहे. तथागत गौतम बुद्धांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यातून समाजसुधारणेचे खूप मोठे कार्य त्यांनी केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, न्यायाचा आणि बंधुत्वाचा विचार सर्वांनी अंगीकारल्यास समाज प्रगतीच्या दिशेने अधिक गतिमान होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: