fbpx

भगवानगड कृती समितीकडून पायथ्यापासुन ते गडापर्यंत हजारो भक्तांची रॅली

बीड : दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे समर्थक व विरोधक यांच्यात दोन गट पडले असून, मुंडे समर्थक गटाने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले असताना. त्यात आता भगवानगडाच्या पायथ्याला स्वरूप कृती समितीने मेळावा घेतला.
श्री क्षेत्र भगवान गडावर यावर्षी कृती समितीकडून आपला भगवानगड, आपला दसरा,आपली परंपरा यावर्षी पासून सुरुवात केली आहे.पहिलेच वर्ष असल्यामुळे सुध्दा हजारो वाहनांचा ताफा यावेळी पाहायला मिळाला तसेच पायथ्यापासुन ते गडापर्यंत हजारो भक्तांची रॅली पाहायला मिळाली, रॅलीमध्ये लहान बालकांनी टाळ मृदुंगाचा गजर पहायला मिळाला, भगवान बाबाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भगवानगड कृती समितीचे भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ तसेच बाळासाहेब सानप यांच्याकडून प्रत्येकी भारज वाडी येथील ऊस तोड कामगार वसंतराव कराड यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.त्यांच्या दोनही मुलांना प्रत्येकी २१ हजार रुपये नगदी स्वरूपामध्ये देण्यात आले. तसेच या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: