fbpx

कार्यकर्ता हा समाजाचा दिशादर्शक असतो – रमेश बागवे

पुणे : कार्यकर्ता हा समज सुधारण्यासाठी ,समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम काम करीत असतो ,खऱ्या अर्थाने तो समजाचा दिशादर्शक असतो असे मत माजी गृह मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले .
रिपबलिकन पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रिपबलिकन रत्न पुरस्कार समारंभात ते बोलत होते .या वर्षीचा पुरस्कार रमेश बागवे यांच्या हस्ते रिपब्लिकन जनशकतीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांना प्रदान करण्यात आला .
3 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली त्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे असे या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापने मागे उद्देश होता की, देशा मध्ये एकच विरोधी प्रभळ पक्ष असावा त्या विरोधी पक्षाने या देशातील कष्टकरी,श्रमिक, शोषित पिढीत जनतेचे प्रश्न संसदेत मांडले पाहिजे व त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. या करिता समाजवादी नेते एस.एम. जोशी, महर्षी कर्वे, लोहिया या सारख्या समविचारी देशभरातील नेत्यांना पत्र व्यवहार हि केला होता या सर्वांना एकत्र करुन व्यापक रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन त्या माध्यमातून एक सक्षम राजकीय पर्याय उभा करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे
स्वप्न होते परंतु त्यांचे महापरिनिर्वान 6 डिसेंबर 1956 रोजी झाल्याने ते सर्व राहून गेले त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅ.राजाभाऊ खोब्रगडे, बी.सी.कांबळे, एन.शिवराज यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना 3 ऑक्टोबर 1957 रोजी केली या घटनेला आज 66 वर्ष झाली आहे.
या कार्यक्रमास माजी महापौर रजनी त्रिभुवन ,माजी नगरसेविका लताताई राजगुरू संयोजक विठ्ठल गायकवाड ,संदीप धांडोरे ,सुजित यादव यासह पुणे शहरातील कार्यकर्ते ,महीला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई आंबेडकर स्मारक येथे करण्यात आले होते .

Leave a Reply

%d bloggers like this: