fbpx

शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत होईल -डॉ. नीलम गोऱ्हे


पुणे:दसऱ्याच्या दिवशी शिवसेना व शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे नक्की कोणाचा दसरा मेळावा जोरात होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. मेळाव्याची तुलना करायची.मात्र आमचा मेळावा पारंपरिक आहे.आमचा मेळावा वाजत गाजत होईल .अशा शिवसेनेच्या नेत्या विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेला पुणे शहरातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीने शुभेच्छा दिल्या आहेत.भाजपला आमच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्या संख्येत मिठाचा खडा टाकायचा आहे राष्ट्रवादीने शुभेच्छा देण्यात गैर काय?मात्र आमची ताकत काय आहे.हे तुम्ही दसरा मेळाव्यालाबघणार. अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर केली.

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकी मध्ये पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अंधेरी विधानसभा निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून येणार. असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जेलमध्ये आहेत. त्यांची उणीव दसरा मेळाव्याला शिवसेनेला भासणार आहे. आम्ही सर्व संजय राऊतांच्या कुटूंबासोबत आहोत न्याय देवतेने न्याय करावा. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
शिंदे गटातील आमदार शिवसेनेवर शिवाजी पार्कच्या दसरा मेळावा वरून सारखे टीका करत आहेत.जो गोळीबार करतो त्यांना शिस्त पाळा असं सांगणं चुकीचा ठरणार, आमचे सर्व मेळावे आतापर्यंत शिस्तीत झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळा बाबत काहीच बोलत नाही आहेत. त्यावरएकनाथ शिंदे यांनी असच मन मोकळं ठेवावं.आणि सत्ता सेनेला देऊन टाकावी. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील लेडी कंडक्टरने एसटी महामंडळाच्या खाकी ड्रेसवरील व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.या प्रकरणी तिला व तिच्या साथीदाराला एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.लेडी कंडकटर मंगल गिरी यांना निलंबित करण्याबाबत मी अजून व्हिडीओ बघितले नाहीय, मात्र आपण काम करत असलेल्या ठिकाणी काही सांस्कृतीक आविष्कार करायचे असतील तेव्हा वरिष्ठांची परवानगी लागते, याबाबतीत घेतली होती का मी विचारून बघणार. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: