fbpx

Pune – चांदणी चौक परिसर मध्ये आज पुन्हा वाहतूक बंद

पुणे : प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता हा पूल पाडण्यात आला. या परिसरात सोमवारी दुपारी पुन्हा ट्रॅफिक बंद  असणार आहे. अशी माहिती पुणे पोलीस यांनी दिली आहे.

पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी असल्यामुळे आज दिवसभरातून २ वेळा या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे बंद केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खडक फोडण्याचे काम ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक २० मिनिट बंद केली जाईल. दुपारी १ ते २ दरम्यान २०० मीटर लांब गाड्या २० मिनिटासाठी थांबवल्या जातील. अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले सर्व्हिस रोड लवकरात लवकर सुरु व्हावेत यासाठी हे खडक फोडण्याची गरज आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यात येत आहे. कर दुपारच्या दरम्यान काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: