fbpx

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार -चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकां कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका एकत्रच घ्या. असं आव्हानच राज्य सरकारला दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. आणि हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात अजूनही बाकी आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. असं विधान उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलताना केल आहे.

चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नागरिकांशी पुण्यात संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग वेळ मागणार आहे. त्यानंतर निवडणुका लागतील. तोपर्यंत निवडणुका लांबणीवर पडणार हे स्वाभाविक आहे.असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला. सत्तार यांनी शिंदेगट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,
सगळं काही नीट चालू असताना असे विषय काढू नये. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. वाढलेल्या पक्षाच्या आधारे स्वबळावर निवडणुका लढण्याचाही अधिकार आहे. तसा तो भाजपलाही आहे.असा सूचक इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. तसं विधानच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला तुमच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असतात. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: