नवीन निवासी रिअॅल्टी लॉन्चमध्ये वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ: प्रोपटायगर
मुंबई : सणासुदीचा काळ उत्साहात सुरू असताना भारतातील रिअल इस्टेट विकासकांना या क्षेत्रामधील रिकव्हरीला चालना मिळण्याची आशा आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. २०२१ च्या तिस-या तिमाहीच्या (जुलै ते सप्टेंबर) तुलेनत नवीन पुरवठ्याने वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ केली.
आरईए इंडिया मालकीचे ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठ प्रोपटायगर डॉटकॉमने जारी केलेला निवासी बाजारपेठ ट्रेण्ड्सवरील त्रैमासिक अहवाल रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्टेंबर २०२२ नुसार प्रबळ मागणी पाहता निवासी विक्रीने प्रबळ वाढ सुरू ठेवली आहे, जेथे मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये विक्री करण्यात आलेल्या ५५,९१० सदनिकांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान वार्षिक ४९ टक्क्यांची वाढ होऊन ८३,२२० सदनिकांच्या विक्रीची नोंद करण्यात आली आहे.
‘’रिअल इस्टेट उद्योग महामारी आणि त्यानंतर झालेल्या परिणामांमधून पुन्हा सावरत आहे आणि हे आमच्या अहवालातील डेटा ट्रेंड व माहितीमधून स्पष्टपणे दिसून येते. विशेषत: नुकतेच सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात मालमत्ता गुंतवणूकीबद्दल ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. यावर्षी तिस-या तिमाहीत घरांच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि यामुळे पुढच्या तिमाहीसाठी देखील उत्तम मागणी दिसून येईल,’’ असे विकास वाधवान हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीएफओ म्हणाले.
वाधवान पुढे म्हणाले, ‘’एकूण व्याजदरांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी घरांसाठी मागणी कमी झालेली नाही, ज्याचे श्रेय घराचे मालकीहक्क मिळवण्याप्रती नवीन विश्वासाला जाते. खरेतर आम्ही आमच्या अहवालामधून अनुमान काढला आहे की, निवासी मालमत्तांसाठी मागणीने २०१९ मधील तिस-या तिमाहीमधील (जुलै ते सप्टेंबर) महामारीपूर्वीच्या पातळ्यांना मागे टाकले आहे. सणासुदीच्या भावना आणि ऑफर केलेल्या विविध सवलतींमुळे विकासकांना खात्री आहे की, मालमत्ता खरेदी करण्यात ग्राहकांची आवड आणखी वाढेल.”
मुंबई आणि पुणे पुन्हा अव्वल स्थानावर:
२०२२ च्या तिस-या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) एकूण विक्रीच्या ५३ टक्के हिस्स्यासह मुंबई आणि पुणे चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहेत. बहुतेक विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या (२७ टक्के) किंमती ४५ लाख ते ७५ लाख रूपयांपर्यंत कमी झाल्या.
रेडी-टू-मूव्ह-इन सदनिकांची कमी झालेल्या यादीमुळे विक्री करण्यात आलेल्या जवळपास १९ टक्के सदनिका आरटीएमआय प्रॉपर्टीज होत्या, तर उर्वरित ८१ टक्के सदनिकांचे बांधकाम सुरू होते किंवा नवीन लॉन्च होते. आमचा नवीन कंझ्युमर सेंटिमेंट आऊटलुक (जुलै-डिसेंबर २०२२) नुसार ५८ टक्के संभाव्य गृहखरेदीदार आरटीएमआय प्रॉपर्टींचा शोध घेत आहेत.
निवासी रिअॅल्टीची २०२२ च्या तिसर्या तिमाहीमधील स्थिर मागणी गती
विक्री | २०२२ | २०२१ | तिमाही वाढ | वार्षिक वाढ | |
शहर | तिसरी तिमाही | दुसरी तिमाही | तिसरी तिमाही | ||
अहमदाबाद | ७,८८० | ७,२४० | ५,४८० | ९ टक्के | ४४ टक्के |
बेंगळुरू | ७,८९० | ८,३५० | ६,५५० | -६ टक्के | २० टक्के |
चेन्नई | ४,४२० | ३,२२० | ४,६७० | ३७ टक्के | -५ टक्के |
दिल्ली एनसीआर | ५,४३० | ४,५२० | ४,४६० | २० टक्के | २२ टक्के |
हैदराबाद | १०,५७० | ७,९१० | ७,८१० | ३४ टक्के | ३५ टक्के |
कोलकाता | २,५३० | ३,२२० | २,६५० | -२२ टक्के | -५ टक्के |
मुंबई | २८,८०० | २६,१५० | १४,१६० | १० टक्के | १०३ टक्के |
पुणे | १५,७०० | १३,७२० | १०,१३० | १४ टक्के | ५५ टक्के |
भारत | ८३,२२० | ७४,३३० | ५५,९१० | १२ टक्के | ४९ टक्के |
स्रोत: रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – जुलै-सप्टेंबर २०२२, प्रॉपटायगर रिसर्च
‘’महामारीचा प्रादुर्भाव कमी झाला असताना निवासी प्रॉपर्टी बाजारपेठेची स्थिती सुरळीत होत आहे. मागणी वाढत आहे (२०२२ ची जुलै-सप्टेंबर तिमाही), तसेच प्रॉपर्टी विक्रीने लक्षणीय दोन अंकी वार्षिक विकासाची नोंद केली आहे. सकारात्मक गृहखरेदीदार आणि निवासी रिअॅल्टीमध्ये गुंतवणूक करण्याची भावना, तसेच सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याच्या भावनेला मिळालेली चालना यामुळे विकासकांना नवीन प्रकल्प लॉन्च करण्यास प्रेरणा मिळाली आहे,’’ असे हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमच्या संशोधन प्रमुख अंकिता सूद म्हणाल्या.
सूद पुढे म्हणाल्या, ‘’एकूणच, ट्रेण्ड्समधून आगामी तिमाहींमध्ये निवासी रिअॅल्टीसाठी सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे; सणासुदीच्या काळातील सूट व स्थिर पेमेंट योजना, तसेच नवीन घराचे मालकीहक्क मिळवण्याचे महत्त्व अशा कारणांमुळे मागणीमध्ये वाढ होत राहिल.’’
नवीन लॉन्चनी सलग दुस-या तिमाहीसाठी दोन अंकी वाढीची नोंद केली:
प्रोपटायगर डॉटकॉमचा नवीन सदनिका बाजारपेठेसाठी तिस-या तिमाहीचे (जुलै ते सप्टेंबर) विश्लेषण निदर्शनास आणते की, २०२२ च्या तिस-या तिमाहीमध्ये एकूण १,०४,८२० सदनिका लॉन्च करण्यात आल्या, तसेच नवीन लॉन्च २०१५ मधील १,००,००० सदनिकांच्या सरासरी तिमाही पातळ्यांइतके होते. एकूण नवीन पुरवठ्याने मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत वार्षिक (२०२१ ची तिसरी तिमाही वि. २०२२ ची तिसरी तिमाही) ६१ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली आणि २०२२ ची दुसरी तिमाही ते २०२२ ची तिसरी तिमाही यादरम्यान तिमाही ३ टक्क्यांची वाढ केली.
किंमतीसंदर्भात २०२२ च्या तिस-या तिमाहीमध्ये बहुतांश नवीन पुरवठ्याची किंमत १ कोटी ते ३ कोटी रूपयांपर्यंत होती, ज्यामध्ये एकूण नवीन प्रॉपर्टी लॉन्चचा हिस्सा ३२ टक्के होता. त्यानंतर हीच किंमत रेंज ४५ लाख ते ७५ लाख रूपयांपर्यंत होती, ज्यामध्ये त्याचा हिस्सा ३१ टक्के होता.