fbpx

Pune – आधीच राजकीय कोंडी, पावसामुळे आदित्य ठाकरे वाहतूक कोंडीतही अडकले

पुणे : पुण्याची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. याच वाहतूक कोंडीचा फटका आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे.
शिवसेना पक्ष आधीच राजकीय कोंडीत असताना आदित्य ठाकरे पुण्याच्या कोंडीत अडकल्याचं चित्र आज पुण्यात पाहायला मिळालं.
आदित्य हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा ताफा तब्बल वीस ते पंचवीस मिनिट पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकला होता. वाकडेवाडी परिसरातून आदित्य ठाकरे हे सारसबागेच्या दिशेने जात असताना तब्बल वीस ते पंचवीस मिनिट अडकून पडले होते. शहरात मुसळधार पाऊस आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे आदित्य ठाकरे यांना कार्यक्रमाला जाण्यासाठी देखील उशीर झाला.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यातच पावसाने वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चाैकातील वाहतूक कोंडीत अडकले होते. यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात.अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: