fbpx

Video – मुसळधार पावसाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीलाही फटका


पुणे : तब्बल ६६ कोटी ३० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या, मंत्रालयानंतरची सर्वांत सुसज्ज हरित इमारत असा लौकिक असलेल्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची आज सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे दाणादाण उडाळ्याचे बघायला मिळाले. 

परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे वादळ, वारा, पाऊस, अतिउष्णता, हवा आदींवर आधारित पर्यावरणपूरक बांधकामाबाबतचा प्रशासनाचा दावा फोल ठरला. तसेच हे आच्छादन कोसळून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या गाडीची काचही फुटली. कार्यालयातील कागदपत्रे वाऱ्याने उडाली.सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लौकिकाचे छप्पर कोसळल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील छताचे पीओपी आच्छादन कोसळले. त्याचा फटका जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या शासकीय वाहनाला बसला. डॉ. देशमुख यांच्या चारचाकीची मागील काच आच्छादन कोसळून फुटली. सुदैवाने त्या वेळी गाडीत कोणीही नव्हते. तसेच वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे उडाली.

 

Leave a Reply

%d bloggers like this: