fbpx

कोरोना काळात महानगरपालिकेने PFI सोबत केला होता करार

पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेने वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या कार्यालयावर छापे टाकल्यानंतर १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यानंतर या संस्थेकडून राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवाया करण्यात येणार असल्याचे खुलासे झाले असून या संघटनेशी पुणे महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी करार केला असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने मुस्लीम व्यक्तींच्या मृतहेदाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने या संस्थेची मदत घेतली होती. महापालिकेत त्यावेळी भाजपची सत्ता होती.
त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तातडीने PFI सोबतचा करार रद्द केला.
१३एप्रिल २०२० रोजी महापालिकेने हा करार केला होता. त्यानंतर २ जून २०२० रोजी हा करार रद्द करण्यात आला होता. ज्यावेळी PFIचा महापालिकेशी करार होता त्यावेळी राझी अहमद खान हा व्यक्ती या संस्थेचे काम पाहत होता. तो सध्या NIAच्या ताब्यात आहे. तर ATS कडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: