fbpx

Pune – कोंढवा भागातून ६ पीएफआय च्याकार्यकर्त्यांना पोलिसांनी का अटक केली?

पुणे : पुण्यासह देशभरात एनआयए आणि एटीएसकडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती त्यानंतर पीएफआयकडून करण्यात आलेल्या आंदोलनात केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले होते.

. या प्रकरणी पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून 153, 124, 109, 120 ब ही कलमं नव्यानं ऍड करण्यात आली होती. दरम्यान, आज पहाटे कोंढवा येथून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध एनआयए आणि एटीएसकडून करण्यात आलेल्या छापेमारीनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज पीएफआय आणि तिच्याशी संबंधित अन्य संघटनांच्या सहा कार्यकर्त्यांना आज पहाटे ताब्यात घेण्यात आलं. अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: