fbpx

नवरात्रीनिमित्त ‘दगडूशेठ दत्तमंदिरात’ तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना

पुणे : नवरात्रीनिमित्त बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात आयोजित नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. विविधरंगी फुलांची आरास व विद्युतरोषणाई देखील यानिमित्ताने करण्यात आली आहे.

यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. दत्तमंदिराच्या स्थापनेचे हे १२५ वे वर्ष आहे.

ट्रस्टचे विश्वस्त राजू बलकवडे व त्यांच्या पत्नी हेमलता बलकवडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नवरात्रोत्सवात मंदिरात भजने व देवीच्या भक्तीसंगीताचा कार्यक्रम देखील होणार आहे. दत्तमंदिरामध्ये नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषासोबत देवीनामाचा घोष देखील भक्तांनी केला. नवरात्रोत्सवात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: