fbpx

‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द, ‘तो’ व्हिडिओ बनावट असल्याचा अल्ट न्युजचा दावा

पुणे :  पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशद्रोहाचा गुन्हा केल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली होती. नंतर थोड्याच वेळात पुणे पोलिसांनी त्यानंतर पीएफआय’च्या पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.
अवघ्या काही तासातच पुणे पोलिसांनी ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द केला आहे.

दरम्यान, ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यावरून पुणे पोलीस संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचं स्पष्ट केलं होतं.
पुणे शहरातील बंड गार्डन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांवरील देशद्रोहाचं कलम सदर गुन्ह्यातून हटवल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे ते कलम लागत नाही, त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या असा दावा अल्ट न्युज या फॅक्ट चेक करणाऱ्या न्युज पोर्टलने केलाय. – अल्ट न्युजने पुण्यातील ज्या व्हिडीओमधे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय तो व्हिडीओ त्याचवेळेस इतर कॅमेरांमधे शुट झालेल्या व्हिडीओ सोबत पडताळून पाहिलाय. ज्यामधे इतर कॅमेरांमधे शुट झालेल्या व्हिडीओजमधे पॉपुलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा देण्यात येत असल्याच ऐकु येतय. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमधेच फक्त पाकिस्तान जिंदाबाद ची एक घोषणा ऐकु येत असल्याच अल्ट न्यूजने म्हटलय. ज्या क्षणाला वादग्रस्त व्हिडीओमधे पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा ऐकु येता त्याच क्षणाला इतर व्हिडीओजमधे पॉपुलर फ्रंट जिंदाबाद अशा घोषणा ऐकु येतायत असं अल्ट न्युजने म्हटलय. अल्ट न्यूजने पुण्यातील या वादग्रस्त व्हिडीओ बाबतच त्यांच आर्टीकल त्यांच्या पोर्टलवर प्रकाशीत केलय.

Leave a Reply

%d bloggers like this: