fbpx

नागरिकांच्या पैश्याचे योग्य नियोजन व्हावे आणि कामाची गुणवत्ता वाढावी; आपची मागणी

पुणे : आम नागरिक मागील ३-४ महिन्यापासून खड्डे बुजून द्या अशी सातत्याने मागणी करत आहेत, खड्डे बुजवण्याचे काम स्मार्ट सिटी अधिकारी म्हणतात मनपा चे आहे , मनपा म्हणते आम्हाला अजून हस्तांतर केलेल नाहीत, कधी म्हणतात आमच्याकडे डांबर नाही, कधी म्हणतात बजेट नाही, गाडी नाही आणि नागरिकांना विनाकारण हलपाटे मारावे लागतात. अनेक भागामध्ये पाणी साचल्यामुळे जीव मुठीत धरून , उड्या मारून नागरिकांना ये-जा करावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैश्याचे योग्य नियोजन व्हावे आणि कामाची गुणवत्ता वाढावी, अशी मागणी आमा आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी बालवाडी, बाणेर येथील सगळ्या रस्त्याची पहाणी करून प्रशासनाला पाठवले आहेत. काही अधिकारी तर फोटो पाहायला पण तयार नाहीत वरून सांगतात ९०० कोटीच्या बजेट मध्ये काहीच होत नाही पैसे खूप कमी आहेत, अशी उत्तरे मिळतात. काल आमच्या भागातील दोन माजी नगरसेवकांनी मनपा कडून रस्ते करून घेतल्याचे फोटो टाकले आहेत, त्यामधील एक रास्ता तर स्वतःच्या गल्लीतीलच आहे. आनंदाची गोष्ठ आहे.

आम आदमी पार्टी च्या जनहिताच्या मागण्या पालिका प्रशासनाने पूर्ण कराव्यात.

१. एकच रस्ता नव्याने न करता प्रभागातील सगळ्या रस्त्यांचे खड्डे आधी बुजवावेत, म्हणजे सर्वाना फायदा होईल.

२.मागील अनुभव आणि इतिहास असा सांगतो कि लाखो करोडो रुपय खर्च करूनही मनपाने केलेले रस्ते सहा महिने किंवा एका वर्षात खराब होतात. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड (DPL) हा साधारण ३ वर्षाचा असतो. ह्या रस्त्याची संपूर्ण माहिती सोशिअल मीडिया वर उपलब्ध करून द्यावी, तसे फलक त्या दोनी रस्त्यावर लावावेत. ठेकेदाराचे नाव, रस्त्याची लांबीही , रुंदी, उंची, बजेट, dlp कालावधी.

३.ह्या दोनी रस्त्याचे सोसिअल ऑडिट व्हावे, कामाचा गुणवत्ता अहवाल सादर करावा.

४. आज पर्यंतच्या सगळ्या तयार रस्त्याची परिस्थिती खूप खराब आहे, सगळ्या रस्त्याची DLP नुसार कारवाई व्हावी. त्याची यादी जाहीर करावी.

ह्या सर्व परिस्थितीची चौकशी व्हावी आणि कायद्यानुसार रस्त्याची कामे व्हावीत ही आप ची मागणी.

Leave a Reply

%d bloggers like this: