Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बारामती आधी निर्मला सीतारामन यांची पुण्यात संपर्क मोहीम

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज धनकवडी येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयात निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची व भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाची बारामती मोहीम यशस्वी करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेतची बैठक होत आहे. त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्याची सुरूवात गुरूवारपासून शहरी भागातील संपर्काने झाली. या बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे लक्षात घेऊन या बैठकीला महत्त्व देण्यात आले. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने काही सूचना केल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज पुणे शहरातील विविध भागात जाऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत व पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. तसेच भोर जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी पदाधिकाऱ्यांची संवाद साधल्यामुळे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading