Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

NIA चे पुण्यातील पीएफआयच्या कार्यालयावर छापे


पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयानं केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह 10 राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. पीएफआयच्या पुण्यातील कार्यालयावर देखील एनआयएने छापे टाकले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

पुण्यासह देशातील अनेक शहरात राष्ट्रीय तपास संस्थेची आज सकाळपासून छापेमारी सुरू असून केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले असून संस्थेने टेरर फंडींग, संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग या सर्व विषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या PFIच्या कार्यालयावर छापा टकून चौकशी करण्यात येत आहे.

पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची स्थापना झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली होती. तर या संघटनेचे दहशतवाद्यांशी काही संबंध आहेत का? हे तपासण्यासाठी देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून पुण्यातील PFIच्या कार्यालयाजवळ सीआरपीएफची तुकडी दाखल करण्यात आली आहे.

एनआयएनं तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई PFI स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम इथंही झडती घेण्यात आली आहे. NIA आणि ED नं PFI चे अध्यक्ष OMA सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी इथं मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत. एनआयए, ईडी आणि राज्य पोलिसांनी 10 राज्यांमध्ये पीएफआयच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading