fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENTLatest News

२१ व्या पिफसाठी मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात

पुणे : पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ २०२३’ साठी मराठी चित्रपट स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. सन २०२२ मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेश अर्ज करता येईल. पिफ २०२३ दिनांक १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रवेश अर्ज करताना २ डीव्हीडी किंवा व्हिडीओ लिंक आणि पासवर्ड पाठवणे आवश्यक असून प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६ पर्यंत अशी आहे.

चित्रपटाचे शिर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असावे, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला गेलेला असावा त्याचे व कोणतेही पोस्ट-प्रोडक्शन संबंधी काम बाकी नसावे, संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन २०२२ मध्येच झाली आहे यासाठी लॅब अथवा स्टुडीओ चे पूर्ततापत्र सादर करून व त्याची डीसीपी प्रिंट दाखवण्यास तयार आहे हे प्रमाणित करून द्यावे आदी बाबींची पूर्तता पिफ २०२३ साठी अर्ज करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी करावयाची आहे. सदर प्रमाणपत्र फक्त २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करिता ग्राह्य धरण्यात येईल याची निर्मात्यांनी कृपया नोंद घ्यावी. पिफ आणि चित्रपट महामंडळ यांनी घालून दिलेले सर्व नियम व अटी सर्व प्रवेशिकांवर लागू असतील.

अधिक माहिती https://www.piffindia.com/ या पिफच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: