fbpx

पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात लाल महाल आणि सावित्रीबाई फुले प्रतिमेचा समावेश करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समतावादी बोधचिन्ह निर्माण आंदोलन कृती समिती

पुणे : सा. फु. पु. विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवारवाडा काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि रयतेच्या स्वराज्याचे प्रतिक असणारा लाल महाल समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून होत असून आता हा लढा व्यापक करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सन २०१९ पासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गती देण्यासाठी पुण्यातील समविचारी संघटना, व्यक्ती संस्थांची एक व्यापक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बोधचिन्ह निर्माण आंदोलन गतीमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. त्यानुसार सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापन दिन आणि छत्रपती शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक दिनानिमित्त सा.फु.पु.वि.चे मा. कुलगुरूंना या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे. तसेच दिनांक २५ सप्टेंबर रोजी म. फुले वाडा येथे अपेक्षित- संकल्पीत बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेत प्रा. प्रतिमा परदेशी, संतोष शिंदे, प्रा. सुहास नाईक, अंकल सोनवणे, शिल्पा शिवणकर, मुकुंद काकडे, रोहिदास तोडकर आदिंनी दिली

बोधिचिन्हात लाल महाल आणि सावित्रीबाई फुले प्रतिमेचा समावेश करण्या मागील भूमिका

सा.फु.पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात पुण्याचे ऐतिहासिक प्रतिक म्हणून शनिवार वाड्याचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार वाडा हा विषमतावादी संस्कृतीचे प्रतिक आहे. त्याचा इतिहास हा कष्टकरी बहुजऱ्या आदेशाचे फर्मान शनिवार वाड्यातून निघाले होते. ही घोर ज्ञानबंदी होती. पेशवाईचे प्रतिक असणाऱ्या शनिवारवाड्यातूनच शेतकऱ्यांवर अन्यायकारक महसुल वसूलीचे फर्मान सोडत शेतकऱ्यांना सुरूंग ठोसुन डवण्याचा शिक्षा दिल्या गेल्या होत्या. अस्पृश्यांच्या गळ्यात गाडगी आणि पाठीला खराटा बांधण्याची सक्ती करण्यात आली होती. शनिवारवाडा जातीयवादी-पुरुषसत्ताक मूल्य-संस्कृतीचे प्रतिक आहे. विषमता मूलक शोषणाचे समर्थन करणारा शनिवारवाडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात असता कामा नये. तर त्या ऐवजी पुण्याच्या अस्मितेचे प्रतिक, ऐतहासिक वारसा असणारा आणि शनिवारवाड्यांच्या तब्बल १०२ वर्ष आधी बांधला गेलेल्या लाल महालाचा समावेश बोधचिन्हात तात्काळ करण्यात यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.

पुणे विद्यापीठाचा नामविस्तार ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करावे अशी मागणी कृती समितीने केली होती. २००४ सालापासून सुरू असणाऱ्या या मागणीला अखेर दि. ७ जून २०१४ रोजी यश आले आणि या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. दि. ९ ऑगस्ट २०१४ रोजी नामविस्ताराचा समारंभ पार पडला. आता विद्यापीठाचे नाव ‘सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ’ करण्यात आले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या मागणी आंदोलनातही आम्ही ही भूमिका मांडली आहे की, केवळ पुण्यातच नव्हे तर सर्वत्र स्त्रीशूद्रादिशूद्रांच्या ज्ञान संघर्षाचा पाया हा सावित्रीबाई फुले यांनी रचला आहे. ज्ञानवरील उच्चजातीय आणि पुरुषी बंदी मोडण्यासाठी प्रसंगी शेणदगडांचा माराही सहन केला आहे. स्त्रियांना ज्ञानाची कवाड उघडणाऱ्या ज्ञानज्योतीचे नाव पुण्याच्या विद्यापीठाला दिले पाहिजे. आता आम्ही त्याच ज्ञानज्योतीची प्रतिमा बोधचिन्हात समाविष्ट करावी अशी मागणी करीत आहोत. जुन्या बोधचिन्हातील शनिवारवाडा हटवा आणि सावित्रीबाईच्या प्रतिमेसह लाल महाल समाविष्ट करा अशी सा.फु.पु.वि. समतावादी बोधचिन्ह निर्माण अंदोलन कृती समितीची मागणी आहे. या अपेक्षित बोधचिन्हाचे प्रकाशन म. फुलेवाडा- समता भुमी येथे दि. २५.९.२२ रोजी सायंक समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी समन्वयक प्रा. प्रतिमा परदेशी, संभाजी ब्रिगेड’चे संतोष शिंदे, सत्यशोधक प्रबोधन महासभेचे उपाध्यक्ष राहिदास तोडकर, शिल्पा शिवणकर, राजेंद्र शेलार, व्ही. जे. वळवी, मारुती जाधव, महेश बनकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनावणे, प्रा. सुहास नाईक, शंकर भडकवाड, श्रीकांत चव्हाण हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: