fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

वी ऍपवर तुमची स्वतःची प्लेलिस्ट बनवा आणि आयपॅड जिंका!

संगीत शौकिनांसाठी खुशखबर! आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वीने आपल्या ग्राहकांसाठी आयपॅड व ऍमेझॉन गिफ्ट व्हाउचर्स जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करवून दिली आहे. वी ऍपवर कमीत कमी ५ गाण्यांची एक प्लेलिस्ट स्वतः तयार करून वी ग्राहक या संधीचा लाभ मिळवू शकतील.

लिसन मोर अँड विन मोर‘ अर्थात जास्तीत जास्त गाणी ऐका आणि जास्तीत जास्त बक्षिसे जिंका अशा या अनोख्या आणि आकर्षक ऑफरमध्ये विजेत्यांची निवड कमीत कमी पाच गाण्यांचा समावेश असलेली प्लेलिस्ट तयार केल्यानंतर ती गाणी ऐकण्यात व्यतीत केल्या जाणाऱ्या वेळेच्या आधारे केली जाईल.

अतिशय सहजसोप्या अशा या ऑफरमध्ये वीने आपल्या युजर्सना आयपॅड आणि १००० रुपयांची ऍमेझॉन व्हाउचर्स यासारखी शानदार निःशुल्क बक्षिसे जिंकण्याची आकर्षक संधी उपलब्ध करवून दिली आहे.  यासाठी त्यांना तीन खूप सोप्या पायऱ्या पार कराव्या लागतील.

१.  प्लेलिस्ट तयार करा: २० पेक्षा जास्त भाषांमधील लाखो गाण्यांमधून कमीत कमी ५ गाणी निवडा आणि एक प्लेलिस्ट तयार करा.

२.  प्लेलिस्ट ऐका: तुमची प्लेलिस्ट आणि उपलब्ध असलेली नवनवीन गाणी

ऐकत रहा.

३. बक्षीस जिंका: कमीत कमी ५ गाण्यांची प्लेलिस्ट तयार करणाऱ्या आघाडीच्या श्रोत्यांमधून आघाडीच्या २६ जणांना एका सोप्या प्रश्नावलीची उत्तरे दिल्यावर एक आयपॅड आणि २५ ऍमेझॉन व्हाउचर्स जिंकण्याची संधी मिळेल.

सर्व विजेत्यांची नावे आणि फोटो वीच्या सोशल मीडिया पेजेसवर शेयर केले जातील. त्वरा कराही ऑफर फक्त १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत खुली असणार आहे.

इंडियन म्युझिक इंडस्ट्रीने (आयएमआय) नुकत्याच केलेल्या डिजिटल म्युझिक स्टडी रिपोर्ट २०२१‘ नुसार भारतीय गाणी स्ट्रीम करण्यात एका आठवड्यात २१.९ तास व्यतीत करतात. याची जागतिक सरासरी अवघी १८.४ तास आहे.  हंगामा म्युझिकच्या सहयोगाने वीने वी ऍपवर एक विशेष म्युझिक स्ट्रीमिंग सेवा तयार केली आहे. यामध्ये २० भारतीय भाषांमधील लाखो गाण्याची लायब्ररी असून वीने कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता ६ महिन्यांची प्रीमियम म्युझिक सबस्क्रिप्शन सादर केली आहे. अनलिमिटेड डाऊनलोड्ससह एचडी क्वालिटी ऑडिओमध्ये ऍड-फ्री संगीताचा आनंद वीचे युजर्स घेऊ शकतात.        

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading