Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

टीटीके प्रेस्टिजतर्फे नवीन फ्लिप-ऑन कूकर सादर    

पुणे : भारतातील आघाडीची किचन उपकरणांची कंपनी टीटीके प्रेस्टिज तर्फे स्वच्छ फ्लिप-ऑन प्रेशर कूकर सादर करण्यात आला आहे. हा भारताचा पहिला ऊतू जाण्यावर नियंत्रण ठेवणारा मध्यम प्रेशरचा कूकर असून त्यात अनोखी लिड-लॉक यंत्रणा आहे. या शृंखलेतील प्रेशर कूकर केवळ हँडल फ्लिप करून उघडता येऊ शकणार आहेत.

हा प्रेशर कूकर आपल्या किचनमधील अनुभवाला संपूर्णपणे बदलून टाकतो. तो एका नावीन्यपूर्ण डिझाईनसह येतो ज्यात तुम्ही केवळ हँडल फ्लिप करून त्याला लॉक किंवा अनलॉक करू शकता. इतर प्रेशर कूकरप्रमाणे यात लिडला जुळवून घेण्याची गरज नाही. लिड ही कोणत्याही दिशेने ठेवून कटकटीविना बंद करता येते.

यातील नावीन्यता आहे ती प्रेशर कूकरच्या अनोख्या लिडमध्ये. ती इतकी खोल आहे, की अन्न शिजवताना ती कोणत्याही प्रकारच्या ऊतू जाण्याला नियंत्रित करू शकते.   टीटीके प्रेस्टिजची फ्लिप-ऑन रेंज एका जास्तीच्या ग्लास लिडसोबत येते. त्यामुळे घरी अन्न शिजविणाऱ्यांना प्रेशर कुकिंगसोबतच परतणे, वाफावणे, उकळणे आणि शिजविणे या सगळ्या प्रक्रिया एकाच भांड्यात करता येतील. घरी अन्न शिजविणारे वैविध्यपूर्ण अशा काचेच्या झाकणाचा उपयोग शिजविण्याच्या प्रक्रियेसोबतच टेबलावरही करू शकतील.

प्रेशर इंडिकेटरमुळे सुरक्षेचा एक जास्तीचा थर उपलब्ध होतो. तसेच, कूकर नीट बंद केल्याशिवाय दाब निर्माण होणार नाही व कूकरमधील दाब कमी झाल्याशिवाय कूकर उघडणार नाही, हे अनोख्या लॉकिंग सिस्टिममुळे निश्चित होते. फ्लिप-ऑन स्वच्छ प्रेशर कूकर हा इंडक्शन आणि गॅस या दोन्ही शेगड्यांवर वापरता येतो. याच्यात विशेषत्वाने इंडक्शन बॉटम असल्यामुळे हा प्रेशर कूकर ऊर्जेची बचत करण्यात मदत करतो आणि त्यामुळे अन्न शिजवणे वेगाने होते. तसेच तो हार्ड ॲनोडाईज्ड प्रकारातही उपलब्ध आहे.ही नवी रेंज खरेदीसाठी प्रेस्टीज एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, निवडक डीलर आउटलेट्स, ब्रँडचे ई-स्टोअर आणि इतर आघाडीच्या ईकॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading