Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

स्कोडा ऑटोसाठी यंदाचे वर्ष भारतातील सर्वात दमदार

मुंबई – स्कोडा ऑटो इंडियाने विक्रमी विक्रीचे महिने, तितक्याच नव्या विक्रमांची तिमाही आणि जुने विक्रम मोडणाऱ्या पहिल्या सहामाहीचा काळ 2022 मध्ये अनुभवला आहे आणि आता त्यांनी विक्रीचा आणखी एक विक्रम मोडला आहे. भारतातील 20 हून अधिक वर्षांचा वारसा जपत या वर्षी या कंपनीने गाड्यांच्या विक्रीत आजवरचा सर्वाधिक टप्पा गाठला आहे.

या कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये 4,222 इतक्या गाड्या विकल्या. ऑगस्ट 2021 मध्ये विकलेल्या 3,829 गाड्यांच्या तुलनेत ही संख्या 10 टक्क्यांनी अधिक आहे. 2022 मध्ये स्कोडा ऑटो इंडियाने आतापर्यंत एकूण विक्रीत 37,568 इतका टप्पा गाठला आहे आणि अद्याप या वर्षीची एक तिमाही शिल्लक आहे. यामुळे 2022 हे स्कोडा ऑटोसाठी भारतातील आजवरचे सर्वात दमदार वर्ष ठरले आहे. याआधी 2012 मध्ये कंपनीने 34,678 इतक्या गाड्यांची विक्री केली होती.

स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होलिस म्हणाले, “या वर्षी माझा प्रत्येक संवाद हा 2022 ला सर्वात मोठे, सर्वात यशस्वी वर्ष बनवण्यासंदर्भातच होता आणि आता… आपण ते करून दाखवलं आहे. स्कोडा ऑटोसाठी भारतात आणि सबंध जगात हा महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाचे श्रेय आपल्या टीम्स, आपले भागीदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले ग्राहक आणि आपल्या चाहत्यांचं आहे. आपल्या ब्रँडवर असलेल्या त्यांच्या विश्वासामुळेच हे यश मिळवणं शक्य झालं आहे. आता पुढची वाटचाल करताना आपण आणखी यशोशिखरे पादाक्रांत करण्याचा आणि अनेक क्षितिजे पार करण्याचा निर्धार करूया.”

या यशाचा पाया 2018 मध्ये इंडिया 2.0 ची घोषणा करून रचला गेला होता. त्यावेळी इंडिया 2.0 हा एक अनोखा प्रकल्प होता. यात मेड फॉर इंडिया व्यासपीठांवर आधारित नवीकोरी मेड फॉर इंडिया उत्पादने आणि स्कोडा ऑटो इंडियाच्या व्यावसायिक पद्धतींचे संपूर्ण पाठबळ तसेच अधिक कस्टमर टचपॉईंट्स आणि गाडी बाळगण्याचा आणि देखभालीचा अतिशय कमी खर्च अशा अनेक बाबींचा समावेश आहे. इंडिया 2.0 मधील महत्त्वाचा भाग म्हणजे मेड फॉर इंडिया MQB-A0-IN व्यासपीठ आणि 95 टक्के लोकलायझेशन तसेच गाडी बाळगण्याचा खर्च तब्बल 0.46 रु. प्रति किलोमीटर इतका कमी करणे हा आहे. जुलै 2021 मध्ये सादर झालेली कुशाक एसयूव्ही आणि मार्च 2022 मध्ये आलेली स्लाविया सेडान या गाड्या भारतातील आणि झेक रिपब्लिकमधील टीम्सनी सहकार्याने भारतासाठी तयार केलेल्या पहिल्या जागतिक दर्जाच्या गाड्या आहेत. इंडिया 2.0 गाड्यांच्या या अतुलनीय यशामुळे स्कोडा ऑटो इंडियाच्या विक्रीला चालना मिळाली आहे. यात ऑक्टाविया आणि सुपर्ब या सेडान आणि कोडिअॅक एसयूव्ही या गाड्यांचाही वाटा आहे.

इंडिया 2.0 ग्राहक समाधानातही प्रगती करत आहे. स्कोडा ऑटो इंडिया सातत्याने देशभरातील कस्टमर टचपॉईंट्समध्ये भर घालत आहे. डिसेंबर 2021 मधील 175 टचपॉईंट्सवरून आजघडीला कंपनीने ही संख्या 205 टचपॉईंट्सपर्यंत वाढवली आहे. स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या ग्राहकांच्या अधिक समीप जाण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून 2022 च्या अखेरीपर्यंत 250 टचपॉईंट्सपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading