रसिकांनी अनुभविली गायन-वादनाची सुरेल मैफल
पुणे : पहिल्या दिवशी उदयोन्मुख कलाकारांनी सादर केलेली कला, तर दुसऱ्या दिवशी भारतभरातील संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने दोन दिवसीय विशेष संगीत मैफिलीत अनोखे रंग भरले. विविध वाद्यांचे वादन आणि गायनाच्या सादरीकरणाने रंगलेली बहारदार संगीत मैफल अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
प्रेरणा संगीत संस्थेतर्फे आयोजित ही विशेष संगीत मैफल नुकतेच नवी पेठ येथील पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहात संपन्न झाली. कार्यक्रमात पहिल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर आणि त्यांचे शिष्य यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, भजन, अभंग, लोकसंगीत अशा विविध प्रकारातील गायन सादर केले. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक मिलिंद दाते यांचे शिष्य अनुराग जोशी यांनी बासुरीवादनातून राग भूप सादर केले. त्यांना कार्तिक स्वामी यांनी तबल्यावर साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांचे पुत्र अभय ओक यांच्या बासुरीवादनाने झाली. त्यांनी राग यमन मधील रचना सादर केल्या. त्यांना तबल्यावर कारीकास्वामी यांनी साथ केली. त्यानंतर व्हायोलिनवादक स्व. बाळकृष्ण उपाध्ये यांचे नातू आणि पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे पुत्र राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग हंसध्वनीमध्ये अद्धा आणि तीन तालातील रचना सादर केल्या. त्यांना आशय कुलकर्णी यांनी तबल्यासाठी संगत केली. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात पंडित अजय चक्रबर्ती यांचे शिष्य आणि पटीयाला घराण्याचे गायक पं.इमान दास (बेंगलोर) यांनी आपली कला सादर केली. त्यांनी राग सरस्वतीमध्ये झुमरा ताल आणि झपतालातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यांना सचिन पावगी यांनी तबल्यासाठी तर माधव लिमये यांनी हार्मोनियमसाठी साथसंगत केली.
चौथ्या सत्रात संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे शिष्य शहनाई वादक पं. लोकेश आनंद यांचे शहनाई वादन सादर झाले. त्यांनी राग हेमंत,पहाडी धून मधील रचना सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यासाठी साथसंगत केली.
कार्यक्रमाचा समारोप विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग भूप-नट या जोडरागातील तीन बंदिशी आणि सरगम गीत सादर केले. त्यांना माधव लिमये यांनी हार्मोनियमसाठी तर पं. रामदास पळसुले यांनी तबल्यासाठी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी चौधरी-तिक्का यांनी केले.