Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Ganeshotsav 2022 – मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपती ची प्राण प्रतिष्ठापना

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणारा उत्सव असतो. त्यातही मानाचे पाच गणपती हे विशेष महत्वाचे असतात. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा याची प्राणप्रतिष्ठपणा सकाळी ११वाजता मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाली. यावेळी डॉक्टर दीपक टिळक, . डॉक्टर गीताली टिळक-  केसरी वाडा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ढोल ताशाच्या गजरात आधी श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तब्ब्ल दोन वर्षांनी वाजत गाजत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकित तुफान गर्दी केली होती. लोकमान्य टिळक यांनी यांनी या उत्सवाची सुरवात केली होती. यंदा या उत्सवाचे 129 वे वर्ष आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading