Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Ganeshotsav 2022 मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ची प्राण प्रतिष्ठापना

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणारा उत्सव असतो. त्यातही मानाचे पाच गणपती हे विशेष महत्वाचे असतात. मानाचा पहिल्या ग्राम देवत कसबा गणपती याची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणा यांना मानवंदना म्हणून थोर क्रांतिकारक राजगुरू यांच्या कुटुंबियांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता विधिवत पूजा करून संपन्न झाली.

कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे, यावेळी कसबा गणपती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आधी श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तब्ब्ल दोन वर्षांनी वाजत गाजत श्रींची मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकित तुफान गर्दी केली होती. लोकमान्य टिळक यांनी यांनी या उत्सवाची सुरवात केली होती. यंदा या उत्सवाचे 135वे वर्ष आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading