Ganeshotsav 2022 – मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची प्राण प्रतिष्ठापना
पुणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणारा उत्सव असतो. त्यातही मानाचे पाच गणपती हे विशेष महत्वाचे असतात. मानाचा आज सकाळपासून केसरी वाडा व ग्राम दैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर आता मानाच्या दुसऱ्या ग्रामदेवता च्या तांबडी जोगेश्वरी ची प्राण प्रतिष्ठापना झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तांबडीजोगेश्वरी गणपतीचीप्राणप्रतिष्ठा मिलिंद अनंत काळे आणि मीरा मिलिंद काळे यांच्या हस्ते पार पडली.
गणपती मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली या मिरवणुकीला शिवमुद्रा आणि ताल पथक यांनी वादन केले.मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकित तुफान गर्दी केली होती. यंदा या उत्सवाचे 129वे वर्ष आहे
