गणेशोत्सव 2022 : गणेश मूर्ती कशी असावी? व प्राणपतिष्ठापनेचा मुहूर्त
पुणे : श्री गणेशाच्या आगमनाला अवघा एक दिवस राहिला आहे. सुंदर मोहक गणेश मूर्तींनी बाजारपेठा भरल्या आहेत. अशावेळी (31 ऑगस्ट) गणेश चतुर्थी निमित्त घरी स्थापन केली जाणारी गणेश मूर्ती कशी असावी याबद्दल मूर्तीशास्त्र व धर्मशास्त्रात विवेचन केलेले आहे.
अंगठ्याच्या पेराच्या मापापासून ते १२ अंगुल परिमाण असलेली मूर्ती घरी स्थापन करावी, त्यापेक्षा मोठी मूर्ती स्थापन करू नये. गणपतीची मूर्ती आणताना ती शाडुमातीची व सुबक असावी. पद्मासन घातलेली, ४ हात असलेली, लाल वस्त्र किंवा लाल शेला परिधान केलेली गणेश मूर्ती जास्त प्रशस्त असल्याचे सांगितले गेले आहे.
गणेश मूर्तीच्या प्राणपतिष्ठापनेचा मुहूर्त
गणेश मूर्तीची प्राणपतिष्ठा ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून ते मध्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजे सूर्योदय ते अंदाजे दुपारी १.४५ वाजेपर्यंत केव्हाही करता करता यईल.
– देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे (पुणे) 9823916297
