Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उच्च शिक्षण मंत्र्यांचा उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना सवाल उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते. त्यात अयोग्य काय?

पुणे : सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यावर राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडी खेळाबाबत स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण दिलेलं नाही.तर दहीहंडी खेळ नव्याने समाविष्ट केला आहे.उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते. त्यात अयोग्य काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की 5 टक्के अस्तित्वात असलेल्या खेळाडूंसाठी च्या नोकरीच्या आरक्षण मध्ये दहीहंडी हा खेळ जोडण्यात आला आहे.हे आरक्षण नव्याने देण्यात आलेलं नाही.उद्या जर कोणी म्हटल की विटू दांडी हा खेळ जोडा तर तर ही खेळ जोडला जाऊ शकतो. इतकं सोपं असताना समाजाची दिशाभूल करण्याचं काम काही लोक करत आहे.अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

मागच्या वेळी भाजपचे सरकार सत्तेवर असताना. अमृत योजना आता परत शिंदे व फडणविस यांनी परत आणण्याच्या हालचालीसुरू केल्या आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, अनेक समाजाच्या मागण्या असतात की काही योजना किंवा महामंडळ करता येतील का? त्यामुळे अमृतची योजना आणली पण आमचं सरकार गेलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर खूप काम करायला सुरुवात केलं आहे. अमृतसाठी महामंडळ निर्माण करू. अधिवेशन एकदा झालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः यासाठी एक बैठक घेण्याचा आग्रह करणार आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading