अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची फडणवीस यांच्या बद्दलची मागणी योग्य – संभाजी राजे
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्ये पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण संघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे केली आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे मुख्यमंत्री होते. आता ते सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत. ते विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलीय. तो त्यांचा अधिकार आह; अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
संभाजी राजे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकाराशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. मराठा आरक्षणा विषयी बोलताना संभाजी राजे म्हणाले, मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी आहे. मात्र या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी, असे संभाजी राजे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा निर्णय देखील झाला. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. कुणी स्वातग करत आहे, तर कुणी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करत आहे. त्यावर संभाजी राजे म्हणाले, दहीहंडी चा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब आहे. दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच. मात्र गरीब मराठा समजतील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, असा सल्ला संभाजी राजे यांनी त्यांनी शिंदे व फडणवीस सरकारला दिला.
