माझ्यासाठी ‘तो’ विषय संपलायं; दीपक केसरकरांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंची प्रतिक्रिया
पुणे : संभाजी राजे यांना खासदारकीसाठी शिवसेनेकडून शब्द देण्यात आला होता. पण तो शब्द काही शिवसेनेने पाळणा नाही. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसारकर यांनी ‘शिवाजी महाराज यांचा अपमान आहे’. असे वक्तव्य केले होते. त्यावर आज छत्रपती संभाजी राजे यांनी, माझ्यासाठी तो विषय पूर्णपणे संपलेला असून केसरकर जे बोलले ते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भावना व्यक्त केल्या आहेत, असे म्हणाले आहेत.
माजी खासदार संभाजी राजे हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, ‘छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून करारपत्र घेणे हे गद्दारी नव्हे का, तसेच छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी दिली नाही; हा शिवाजी महाराज यांचा अपमान आहे, असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर टीका केली होती. यामुळे राजकारण चांगले तापले होते. यावर प्रतिक्रिया देताना संभाजी राजे म्हणाले, केसरकर जे काय बोलले ते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्यासाठी हा विषय संपला आहे, असे स्पष्ट केले आहे.
